काँगोत खाण दुर्घटनेत दहा कामगारांचा मृत्यू   

किन्शासा : पूर्व काँगोमधील दक्षिण किवू प्रांतात सोन्याची खाण कोसळून दहा कामगारांचा मृत्यू झाला. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या काबरे प्रदेशातील लुहिही नावाच्या खाणीत बुधवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही खाण कोसळल्याचे बंडखोर गटाचे नायब राज्यपाल दुनिया मासुम्बुको ब्वेंगे यांनी ही माहिती दिली. ब्वेंगे म्हणाले, दक्षिण किवूच्या पूर्वेला असलेला हा भाग वारंवार पूर आणि भूस्खलनाने प्रभावित होतो. दक्षिण किवू रवांडाच्या सीमेला लागून आहे. खाणीमध्ये सुरक्षा निकषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे ही दुर्घटना घडली.

Related Articles